बाळासाहेब आंबेडकरांच्या लढाईत सहभागी व्हा : वंचितला साथ द्या : भुसावळात संजय ब्राह्मणे

0

Sanjay Brahmane भुसावळ : गेल्या दहा-पंधरा वर्षात भुसावळच काय रावेर लोकसभा मतदारसंघाचा कुठलाही विकास झालेला नाही. धर्माच्या नावावर मते मागून राजकारण केले जात आहे मात्र भाजपाविरोधात बोलण्याची हिंमत कुणाचीही नाही केवळ बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याविरोधात बोलू शकतात म्हणून त्यांच्या लढाईत सहभागी व्हा, वंचित बहुजन आघाडीला मतदान करून खासदार होण्याची संधी द्या, असे आवाहन रावेर लोकसभेतील वंचितचे उमेदवार इंजि.संजय ब्राह्मणे यांनी येथे केले. शहरातील रजा टॉवर भागात गुरुवारी सायंकाळी त्यांची कॉर्नर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

दहा वर्षात विकास शून्य
संजय ब्राह्मणे म्हणाले की, तीन वर्षापूर्वी एनआरसी व सीएएविरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी मी स्वतः मुस्लीम समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन केले. देशात भाजपा 200 पारही जावू शकत नाही मात्र त्यांच्याकडून चारशे पारच्या घोषणा दिल्या जात आहेत. मुळात त्यांचा बेडा पार झाला आहे, अशी टिका त्यांनी केला. भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन शहर असून दलित व मुस्लीम समाजबांधव येथे मोठ्या संख्येने राहतात मात्र नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भुसावळात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरात पाणी शिरते मात्र ही समस्या दहा वर्षात सुटलेला नाही. वंचितला संधी दिल्यास मूलभूत समस्या सोडवू, अशी ग्वाही त्यांनी दिल.

यांची कॉर्नर सभेला उपस्थिती
कॉर्नर सभेला जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, ईश्वर लहासे, वंचितचे भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव आदींसह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.