जनतेचे भरभरून प्रेम हीच आपल्या विकासकामांची पावती : खासदार रक्षाताई खडसे

जामनेर तालुक्यात मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत : प्रलंबित कामे मार्गी लावण्याची ग्वाही

0

जामनेर : प्रत्येक गावा-गावात मतदारांकडून, सुवासिनींकडून होणारे उत्स्फूर्त स्वागत ही आपल्या विकासकामांची पावती आहे व जनतेच्या ऋणात मी राहू इच्छिते, असे प्रतिपादन रावेर लोकसभेच्या खासदार व महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी केले. जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी त्यांनी प्रचार दौरा केला. प्रत्येक गावांमध्ये ताईंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर सुवासिनींनी त्यांचे औक्षण करीत त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले. जनतेकडून मिळत असलेले प्रेम पाहून ताईदेखील भारावल्या व हीच आपल्या कामांची पावती असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

मतदार राजाकडून ताईंचे उत्स्फूर्त स्वागत
रावेर लोकसभेतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जामनेर तालुक्यातील मौजे देवपिंप्री फाटा, भराडी, भिलखेडा, नाचनखेडा, लोहारा, कळमसरा, जंगीपुरा, शेंदुर्णी, गोंदेगाव गावात गुरुवारी प्रचार दौरा केला. जामनेर शहर व तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी वकाँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते. ताईंनी वरील गावांमध्ये भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन करीत विकासकामे करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.


कॉपी करू नका.