रावेरला निवडणूक यंत्रणेकडून 374 ईव्हीएमचे सिलिंग

13 मे रोजी रावेर लोकसभेची निवडणूक : 784 बॅलेट युनिट

0

रावेर : जळगावसह रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी निवडणूक होत आहे. रावेर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव यांच्या मार्गदर्शनखाली रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूककामी मतदान यंत्र सिलिंग करण्यात आली. या कामासाठी 25 टेबलावर कर्मचार्‍याची नेमणूक करण्यात आली.

374 ईव्हीएमचे सिलिंग
374 मतदान यंत्रे (ईव्हीएम) सिलिंग व सेटींग करण्यात आले. हे मंगळवारी व बुधवारी करण्यात आले. मतदानाचा दिवस हा केवळ चार दिवसांवर आल्याने महसूल यंत्रणेने कामे पूर्ण करण्यास गती दिली आहे. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी 8.30 वाजता ईव्हीएम सिलिंग सेटिंगचे काम करण्यात आले. बुधवारपर्यंत संध्याकाळी पाच ईव्हीएम सिलिंग करण्यात आले. रावेर विधानसभा मतदार संघातील 314 मतदान केंद्रासाठी 374 कंट्रोल युनिट, 408 व्हिव्हीपट तसेच 784 बॅलेट युनिटचे सिलिंग व सेटींग करण्यात आले. सर्व मतदान मशीनचे सिलिंग सेटींग केल्यानंतर पाच टक्के मॉक पोल घेण्यात आले. उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांनी संपूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे सुरू असल्याचे सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी पिनाटे यांची भेट
निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी मंगळवार, 7 रोजी भेट देऊन कामकाजाची पाहणी करीत मार्गदर्शन केले. प्रसंगी तहसीलदार बंडू कापसे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, अपर तहसीलदार मयूर कळसे, निवडणूक नायब तहसीलदार किशोर पवार, आर.डी.पाटील व सर्व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


कॉपी करू नका.