डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : दोन आरोपींना जन्मठेप

0

Dr.Narendra Dabholkar murder case : Life imprisonment for two accused मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्याायलयाने तब्ब्बल 11 वर्षानंतर निकाल दिला आहे.आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेसह 5 लाख दंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर तीन संशयीतांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याशी संबंधित खटल्यांसाठी विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जाधव यांनी हा निर्णय दिला. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे.

2013 मध्ये होती हत्या
मॉर्निंग वॉकला निघालेल्या दाभोळकर यांची गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यातील भरवस्तीत सकाळी ही घटना घडली होती. सुरुवातीला महाराष्ट्र पोलिस त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. सीबीआयने दाभोळकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड.सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींना अटक केली व त्यांच्याविरोधात सप्टेंबर 2021 मध्ये खटला सुरू झाला. म्हणजेच हत्येच्या 8 वर्षांनंतर आरोपींविरोधात खटला सुरू झाला व आता निकाल आला आहे.


कॉपी करू नका.