रावेर लोकसभेत श्रीराम पाटील यांचा विजय होणार : कर्मभूमीत कार्यकर्त्यांचा विश्वास

0

रावेर : कर्मभूमी असलेल्या रावेर शहरात अक्षयतृतीयेच्या दिवशी महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी शहरातील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने प्रचार फेरीत सहभागी होत श्रीराम पाटलांच्या विजयाचा नारा दिला. रावेर शहरातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला.

रावेरातील जनता श्रीराम पाटील यांच्या पाठीशी
रावेर ही श्रीराम पाटील यांची कर्मभूमी आहे. व्यवसायाचा श्रीगणेशा त्यांनी रावेरमधूनच करीत ते या क्षेत्रात यशस्वी होत आज यशस्वी उद्योजकांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या यशाचे साक्षीदार रावेरमधील तमाम जनता आहे. श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली.

यांचा प्रचार फेरीत सहभाग 
माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी प्रल्हाद महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख योगीराज पाटील, हरीश गनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी दीपक पाटील, योगेश गजरे, राजीव सवर्णे, जगदीश घेटे, मेहमूद शेख, सोपान साहेबराव पाटील, योगेश पाटील, सादीक मेंबर, डॉ.सुरेश पाटील, डी.एस.चौधरी, शीतल पाटील, दिलीप कांबळे, सुरेश चिंधू पाटील, दीपक पाटील, विजय गोटीवाले, ज्ञानेश्वर महाजन, गणेश बोरसे, अविनाश पाटील, राकेश घोरपडे, सावन मेढे, मंदार पाटील, गयास शेख, नारायण घोडके, धुमा तायडे, अ‍ॅड.आर.आर.पाटील, असद मेंबर, अय्युब मेंबर, उमेश गाढे, सुनील कोंडे, महेश लोखंडे, गयास शेख, युसूफ शेख, प्रल्हाद बोंडे , यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रचार फेरीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली. जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बोरकर, पीपल्स आर्मीचे असंख्य कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.


कॉपी करू नका.