कुर्‍हा सर्कल भाजपाचा बालेकिल्ला : खासदार रक्षाताई खडसे निवडून येणार !

माजी मंत्री संजय कुटे : कुर्‍हाकाकोडा येथे जाहीर सभा

0

कुर्‍हाकाकोडा : कुर्‍हा सर्कल हा भाजपचा बालेकिल्ला असून नेहमी या परिसरातून भाजपला लीड नेहमीच जास्त मिळतो व यावेळीदेखील खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा खासदार होण्यासाठी जास्तीत-जास्त मतांनी निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री संजय कुटे यांनी येथे व्यक्त केले. कुर्‍हाकाकोडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

कणखर नेतृत्व केवळ मोदीजी
कुटे म्हणलो की, एका कणखत नेतृत्वाच्या हातात देश द्यावयाचा असून ते नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. मोदीजींनी देशभरात अनेक योजना राबविल्या असून देश हिताचे अनेक निर्णय घेतले आहे. संरक्षण क्षेत्रात मोठे भरीव काम मोदीजींच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. गरिबांचा उद्धार करणे हेच एकमेव ध्येय भारतीय जनता पार्टीचे असल्याचे ते म्हणाले.

रक्षा खडसे सक्षम खासदार
प्रतापराव जाधव म्हणाले की, दोन टर्म खासदार राहिलेल्या रक्षा खडसे या सक्षम खासदार आहेत. तिसर्‍यांदा त्या लोकसभेत निवडून जाणार असून त्यांना भरघोस मतांचनी विजयी करावे, असे आवाहन जाधव यांनी केले.

यांची होती उपस्थिती
बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री संजय कुटे, बुलढण्याचे आमदार संजय गायकवाड, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, डॉ.राजेंद्र फडके, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक कांडेलकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पुरनमल चौधरी, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजगर खान पठाण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सोपान झाल्टे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, संतोष खोरखेडे, प्रकाश चौधरी, आनंद हिरोळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, पंचायत समिती सदस्य विनोद पाटील, राजेंद्र सावळे, रवींद्र राजपूत, भाजपा कुर्‍हा शहराधक्ष प्रवीण शिंपी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष ललित सोनवणे, पंकज पांडव, सतीश नागरे, अविनाश वाढे, राहुल खिरळकर, पंकज धाबे, दीपक वाघ, विशाल झाल्टे, प्रवीण भोम्बे, कल्पेश राठोड, उमेश सुशीर, विकास कांडेलकर, बजरंग दलाचे तालुका संयोजक भोला खाटीक, नितीन सोंडे आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


कॉपी करू नका.