मतदान करणार्‍यांना नेत्र तपासणी फीमध्ये 50 टक्के सवलत

वरणगावातील वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान

0

भुसावळ : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे दर निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील मतदार जनजागृती अभियान रावबणार आहेत. मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्र तपासणी फी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

बोटावर शाही दाखवून मिळणार सवलत
13 मे रोजी मतदान केल्यानंतर हे अभियान 13 ते 22 मे वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी शंभर टटक्के मतदान होणे गरजेचे आहे. शासन, प्रशासन, सेवाभावी सामाजिक संस्था मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न करत असतात. या लोकशाही उत्सवासाठी आपला देखील हातभार लागावा म्हणून डॉ.पाटील दाम्पत्य यांनी हा उपक्रम आयोजीत केला आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास वरील सवलतीचा फायदा घेता येणार आहे.

दाम्पत्याने जोपासले सामाजिक भान
डॉ.पाटील दाम्पत्याने वासुदेव नेत्रालय 2014 मध्ये ुसुरू झाल्यापासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत आदी निवडणुकीत उपक्रम राबवत असून आपले सामाजिक भान जोपासत आहे.

सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक : डॉ.नितु पाटील
प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही बळकट करणे होय. मतदान हा लोकशाहीचा सर्वोत्तम उत्सव आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी 13 ते 22 मे या काळात नेत्र तपासणी शुल्कात 50 टक्के सूट मिळणार आहे, याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे डॉ.नितु पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.