महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन धूमस्टाईल लांबवली : पाचोर्यात खळबळ
The gold chain around the woman’s neck extended Dhoomstyle: excitement in Pachora पाचोरा : पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील 40 हजारांची सोन्याची चैन धूमस्टाईलने लांबवली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.
शतपावली करताना लांबवली चैन
एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील मूळ रहिवासी व हल्ली अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर येथील तलाठी कार्यालयाजवळ राहणार्या पल्लवी संदीप पाटील (33) या पाचोरा येथील विवेकानंद नगरात माहेरी आल्या होत्या. दरम्यान, 11 मे रोजी पल्लवी पाटील या आई रंजनाबाई चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास शतपावली करत होत्या.

शहरातील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ दोन दुचाकीस्वारांनी येवून पल्लवी पाटील यांच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाची व 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन ओरबाडून घटनास्थळावरून धूमस्टाईलने पोबारा केला. या प्रकरणी पल्लवी पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे करत आहेत.