ट्रकखाली आल्याने तरुण विवाहितेचा मृत्यू : पाचोरा शहरातील दुर्घटना
Young married woman dies after being hit by a truck : Accident in Pachora city पाचोरा : पाचोरा शहरातील जारगाव चौकात ट्रक मागे घेताना ट्रकखाली आल्याने 26 वर्षीय तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना 15 रोजी सकाळच्या सुमारास घडली.
जारगाव चौकात दुर्घटना
भडगाव तालुक्यातील गिरड गावातील शेख इस्माईल अब्दुलनबी मणियार हे आपली पत्नी सना शेख इस्माईल मणियार (26) यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना पाचोरा येथे नेत होते. जारगाव चौकातील खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखवण्यासाठी 15 मे रोजी सकाळी दुचाकीवरून ते निघाले होते. दरम्यान, जारगाव चौकातील बेशिस्त वाहतूक व वाढते अतिक्रमण यामुळे शेख इस्माईल मणियार हे आपली दुचाकी चालवत असताना रस्त्यावर सना शेख इस्माईल मणियार यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याचवेळी तेथे एक ट्रक मागे येत होता. नेमका त्याच ट्रकच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मणियार या सापडल्याने झालेल्या अपघाताच त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला तर शेख इस्माईल मणियार यांच्यासह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व 4 वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी जखमी झाले. त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर काँग्रसचे पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, इरफान मणियार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.