जनता एक्स्प्रेसमध्ये चोरी : भुसावळातील दोघे आरोपी जाळ्यात


भुसावळ : अप 13201 जनता एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर उभी असताना महिला प्रवाशाची 27 हजार 500 रुपयांचा ऐवज असलेली पर्स 26 रोजी चोरीस गेली होती. या प्रकरणी भुसावळातील दोघा आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. प्रमोद उर्फ पिंटू प्रकाश शिवपूजे (34, बी.एम.वॉर्ड, बाजारपेठ पोलिस ठाण्यामागे, भुसावळ) व रोहित शिवनाथ दासर (34, शिवाजी नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तक्रारदार पूनमसिंग महेंद्रसिंग (27, एम.एस.दुबे रोड, कोनीपाडा, देवी नगर, सिद्धीविनायक चाळ, दहिसर, मुंबई) या 26 रोजी जनता एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 6 च्या बर्थ क्रमांक 62 वरून प्रवास करीत असताना भुसावळ स्थानकावर गाडी आल्यानंतर चोरट्यांनी पर्स लांबवली होती. या पर्समध्येे 23 हजार 500 रुपये किंमतीचे तीन मोबाईल, चार हजारांची रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम कार्ड मिळून एकूण 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी शुक्रवारी दोघा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर रोकड व्यतिरीक्त तीनही मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड व एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित तडवी, नितीन पाटील व रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !