बारावी परीक्षेत भुसावळ विभागात सावित्रीच्या लेकीच टॉपर

बारावी परीक्षेच्या ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष ः निकालाचा टक्का वाढला


भुसावळ : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, 21 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदादेखील या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच टॉपर ठरल्या आहेत. 2022 मध्ये तालुक्याचा निकाल 96.08 तर 2023 मध्ये 93.07 तर यंदा 95.06 टक्के निकाल लागल्याने सुमारे दोन टक्के निकालाचा टक्का वाढला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा असणार आहे. दरम्यान, शहरात ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला. मंगळवारी शहरात पेढ्यांना मोठी मागणी राहिली तर फुलांच्या बुके विक्रीतही वाढ झाल्याचे दिसून आले.

दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : शहरातील दादासाहेब दे.ना.भोळे महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 99.26% टक्के तर वाणिज्य शाखेचा 93.75 टक्के व कला शाखेचा 85.18 टक्के लागला. बारावी विज्ञान शाखेतून प्रथम दिवांश पंकज नारखेडे (93.83 टक्के), द्वितीय- दुर्वेश जयंत वायकोळे (90.67 टक्के) तर तृतीय श्रेया सुनील कोल्हे (89 टक्के) तर चतुर्थ क्रमांक सुविधा राजू फालक (88.83) ने पटकावला. बारावी वाणिज्य विभागातून प्रथम – खोमेश दिलीप चौधरी (72.33 टक्के), व्दितीय- अनिश्का गणेश सोनवणे (70 टक्के) तर तृतीय क्रमांक डिंपल रवींद्र भंगाळे (68.33 टक्के) ने पटकावला. बारावी कला शाखेतून प्रथम क्रमांक अनुजा महेंद्र चौधरी (73.17 टक्के) तर द्वितीय क्रमांक भक्ती प्रल्हाद पटेल (73 टक्के) व तृतीय- नंदिनी किशोर कवडकर (68.33 टक्के) ने पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे महाविद्यालय प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असल्याचे प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी यांनी कळविले आहे.



प्रकाश विद्यालय व ज्यु.कॉलेज, मोठे वाघोदे
मोठे वाघोदे, ता.रावेर : प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल 93.33 टक्के लागला. विज्ञान शाखेत प्रांजल दीपक सोनवणे ही विद्याथिर्र्नी 86.66 टक्के मिळवून प्रथम आली तर निलेखा किशोर चौधरी ही विद्यार्थिनी 86.33 टक्के मिळवून द्वितीय तर किरण महेंद्र तायडे ही विद्यार्थिनी 85.17 टक्के गुण मिळवून तृतीय आली. कला शाखेत आचल अरुण कोळी ही विद्यार्थिनी 81.33 टक्के मिळवून प्रथम आली तर पूनम तुकाराम शिरसाड ही विद्यार्थिनी 80.66 टक्के मिळवून द्वितीय तर तृतीय दिक्षा विनोद वानखेडे ही विद्यार्थिनी 78.50 टक्के मिळवून तृतीय आली. विज्ञान शाखेत मागसवर्गीयातून किरण महेंद्र तायडे ही विद्यार्थिनी 83.50 टक्के तर कला शाखेतून आचल अरुण कोळी ही विद्यार्थिनी 81.33 टक्के मिळवून प्रथम आली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व्ही.एस.महाजन, पर्यवेक्षक आर.पी.बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष पी.टी. महाजन, उपाध्यक्ष श्रावण सीताराम महाजन, चेअरमन डी.के.महाजन, सचिव किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव पी.एल.महाजन व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

फैजपूर म्युनीसीपल हायस्कूल
फैजपूर :
नगरपरिषद संचलित म्युनीसीपल हायस्कलू व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल 96.20 टक्के तर कला शाखेचा 95.20 टक्के तर वाणिज्य शाखेचा 88 टक्के निकाल लागला. शाळेचे मुख्याध्यापक के.टी.तळेले व पर्यवेक्षक एस.ओ.सराफ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. विज्ञान शाखेतून प्रथम दिव्या तुषार गारसे (90 टक्के), द्वितीय योशिता सचिन चौधरी (88.17 टक्के), तृतीय आर्शीया मुज्जमील तडवी (86.67 टक्के) आली. कला शाखेतून प्रथम चेतना नितीन पाटील (80.17 टक्के), द्वितीय- काजल किरण चौधरी (76.83 टक्के) तर तृतीय जयश्री लीलाधर सोनवणे (67.83 टक्के) आली. कॉमर्स शाखेतून प्रथम शाहीन वजीर तडवी (76,50 टक्के), द्वितीय पायल रवीदास छरे (70.83 टक्के), तृतीय रेणुका बापू ठाकरे (70.33 टक्के) आली.

सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक विद्यालय, बोदवड
बोदवड :
राष्ट्रीय शिक्षण संस्था बोदवड संचलित सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा 74.42 व वाणिज्य शाखा 93.22 टक्के निकाल लागला. कला शाखेतून रोशनी बोदडे 60.50 (प्रथम), श्वेता खंडेराव 57.50 (द्वितीय), विशाल बोदडे 56 टक्के (तृतीय) आणि वाणिज्य शाखेतून सौरभ धसाळ 83.33 (प्रथम), कोमल अटक 69.83 (द्वितीय), अर्चना पाटील 69.50 (तृतीय) आली. सर्व विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.

आ.गं.हायस्कूल, सावदा
सावदा :
नगरपालिका संचलित श्री.आ.गं.हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विज्ञान शाखेचा 99.21 टक्के तर कला शाखेचा निकाल 77.14 टक्के लागला. बारावी विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक दुर्वा सुनील महाजन (88.30 टक्के), द्वितीय- भावेश महेश भारंबे (83.67 टक्के) ने पटकावला. कला शाखेतून प्रथम हर्षदा नरेश पाटील (73.33 टक्के) तर द्वितीय भारती पंढरीनाथ चौधरी (68 टक्के) ने पटकावला. यंदा बारावी विज्ञान परीक्षेसाठी 128 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी कला शाखेत 105 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याधिकारी भूषण वर्मा व मुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

कमलाबाई अग्रवाल हायस्कूल, रावेर
रावेर :
शहरातील सौ.कमलाबाई सुंदरलाल अग्रवाल गर्ल्स हायस्कूलचा बारावी कला शाखेचा निकाल 91.24 टक्के लागला. 226 विद्यार्थिनींपैकी 217 विद्यार्थिनी परीक्षेला प्रविष्ट होत्या व त्यापैकी 198 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. प्रथम- पूनम गणेश वैदकर (81.33), द्वितीय- दीक्षा नितीन कोळी (80.17 टक्के), तृतीय- कोमल प्रकाश चौधरी (79.33 टक्के) आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रकाश मुजुमदार, संस्थेचे चेअरमन डॉ.दत्तप्रसाद दलाल, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वाणी, सरदार जी.जी.चे मुख्याध्यापक एस.पी.पाटील, अग्रवाल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर.आर.पाटील, शाळेच्या पर्यवेक्षिका प्रतिभा कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले.

सरदार जी.जी.हायस्कूल, रावेर
रावेर :
शहरातील सरदार जी.जी.हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल 96.60 टक्के लागला. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील 863 पैकी 829 (96.60 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून प्रथम- मंथन मनिष नाईक (86.83 टक्के), द्वितीय नंदिनी उमाकांत कराड व हितेश योगेश महाजन (85.83) तसेच तृतीय हर्षाली देविदास कावडकर व अनुष्का सुनील मेढे (85.66 टक्के) आले. वाणिज्य शाखेतून प्रथम- कल्पश्री किशोर दलाल (87.67 टक्के), द्वितीय मृणाल विलास महाजन (84.67 टक्के), तृतीय जान्हवी संजय महाजन (83 टक्के) तर कला शाखेतून प्रथम प्रणय अनिल महाजन (81.16 टक्के), द्वितीय- रहिम सरदार तडवी (77.63 टक्के), तृतीय गणेश रमेश बोरनारे (71.83) आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, चेअरमन डॉ.दत्तप्रसाद दलाल, उपाध्यक्ष अशोक वाणी, सरदार जी.जी. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.पाटील, अग्रवाल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी, उपमुख्याध्यापक आर.आर.पाटील, शाळेच्या पर्यवेक्षिका प्रतिभा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

धनाजी नाना विद्यालय, खिरोदा. ता.रावेर
सावदा :
खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्याालयातील विज्ञान शाखेचा निकाल 98.30 टक्के तर कला शाखेचा निकाल 62.83 टक्के लागला.
विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक भूमिका प्रमोद चौधरी (87.83 टक्के) द्वितीय- भावेश ललित चौधरी (87.17 टक्के) व तृतीय साक्षी विनोद वाघुळदे (86.67 टक्के) ने पटकावला. कला शाखेतून प्रथम तनुजा हिदायतअली तडवी (83.33 टक्के), द्वितीय सादिया फिरोज तडवी (78 टक्के) तर तृतीय निकिता संतोष सोनवणे (77.50 टक्के) आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष व आमदार शिरीष चौधरी, सचिव प्रभात चौधरी, संचालक व विद्यालयाचे मार्गदर्शक तुकाराम बोरोले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, पर्यवेक्षक एस.पी.चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !