जळगावातील पॅथॉलॉजी चालक डॉक्टरांना 19 लाखांचा गंडा
19 lakhs to the pathology driver doctor in Jalgaon जळगाव : मनी लाँड्रींगमध्ये नाव गुंतल्याचे सांगून जाचातून सुटण्यासाठी जळगावातील पॅथॉलॉजी चालक डॉक्टरांना 19 लाख 20 हजारांचा गंडा घालण्यात आला. 1 ते 18 मे दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलिसात रविवारी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील पॅथॉलॉजी लॅब चालवणार्या डॉक्टरांना 1 मे रोजी अंकुश वर्मा याचा 9205716868 या मोबाइलवरून कॉल व व्हॉट्सअॅप क्र. 9864618238 वरून एसआय सुनीलकुमार मिश्रा याने व्हॉट्सअॅप चॅट व व्हिडिओ कॉल करीत लखनऊ पोलिसातून बोलत असल्याचे सांगितले. डॉक्टरला माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचा सहभाग समोर येत आहे, त्यातून वाचायचे असल्यास आम्हाला पैसे पाठवा, असे सांगितले. त्यानुसार डॉक्टरने अगोदर पाच लाख पाठवले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. असे सात वेळा डॉक्टरकडून 18 मे पर्यंत 19 लाख 20 हजार ऑनलाईन स्वीकारण्यात आले.
