अमळनेर गटशिक्षणाधिकार्‍यांविरोधात गुन्हा : शिक्षण क्षेत्रात खळबळ


Crime against Amalner Group Education Officer : Excitement in education sector अमळनेर : शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत शाळेला मिळालेली शासकीय अनुदानातील पाच टक्के रक्कम देण्याचा तगादा लावणार्‍या अमळनेर पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. रावसाहेब मांगो पाटील (अमळनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या गटशिक्षणाधिकार्‍याचे नाव आहे.

सोशल मिडीयावरही टाकला मजकूर
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बदनामीकारक मजकूर टाकला होता त्यामुळे शाळेचे लिपिीक उमेश राजेंद्र पाटील यांनी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे 27 मे रोजी अर्ज केला होता. त्याची नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात मंगळवार, 28 मे रोजी सकाळी 10.30 वाजता गेले होते. त्यावेळी उमेश पाटील व सहकारी यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची भेट घेवून शाळेची बदनामी करून नका, असे सांगितले. त्यावर रावसाहेब पाटील यांनी शिवीगाळ करून सन-2012 पासून तुमच्या शाळेला जे शासकीय अनुदान मिळाले आहे त्याच्यावर मला पाच टक्के पैसे द्या, नाहीतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द करेल. हा प्रकार घडल्यानंतर उमेश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी रात्री 10.30 वाजता गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !