पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत धरणगाव तालुक्यातील विवाहितेवर अत्याचार


Harassment of a married woman in Dharangaon taluka by threatening to kill her husband and children धरणगाव : पती व मुलांना ठार मारेल, अशी धमकी देत धरणगाव तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय विवाहितेला पळवून नेत विविध ठिकाणी अत्याचार करण्यात आला. 26 जानेवारी 2024 ते 26 मे 2024 दरम्यान हा प्रकार घडला. संशयीत आरोपी पंकज विठ्ठल महाजन (धरणगाव तालुका) याच्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धमकी देत केला अत्याचार
धरणगाव तालुक्यातील एका गावात 28 वर्षीय विवाहिता पती व मुलांसह वास्तव्यास आहे. संशयीत आरोपी पंकज विठ्ठल महाजन याने 26 जानेवारी ते 26 मे दरम्यान महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून वाडी, ता.शिरपूर, मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर, आळंदी, ता.पुणे यासह अन्य ठिकाणी नेत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. त्रास असह्य झाल्याने पीडीतेने धरणगाव पोलिसात धाव घेत मंगळवार, 28 मे रोजी मध्यरात्री एक वाजता संशयित आरोपी पंकज विठ्ठल महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपास सहय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !