वरणगावात 7 रोजी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा सत्कार


वरणगाव : शहराला विकासाची दिशा दाखवणारे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा भव्य सत्कार शनिवार, 7 मार्च रोजी सायंकाळी सात सात वाजता भोगावती नदीपात्रात आयोजत करण्यात आला आहे. माजी मंत्री महाजन यांनी पदावर असताना वरणगाव शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 65 कोटी रुपयांचा निधी वरणगावच्या विकासासाठी खेचून आणला होता शिवाय विकासाबाबत जे वरणगाव पुढे गेले आहे त्याचे श्रेय गिरीश महाजनांना असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. वरणगाव शहरासाठी विकासासाठी डोंगराएवढी मदत करणार्‍या गिरीष महाजनांचा सत्कार खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री व आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !