चाळीसगावच्या महिलेला सीबीआय अधिकार्‍याच्या नावाने साडेआठ लाखांचा गंडा


Chalisgaon woman extorted eight and half lakhs in the name of CBI officer जळगाव : चाळीसगावातील 42 वर्षीय महिलेला सीबीआयमधून बोलतोय, तुम्ही एका गुन्ह्यात अडकलेले असून तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होईल, अशी धमकी देत भामट्याने साडेआठ लाख रुपये उकळून गंडा घातला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात सुनील कुमार आणि अनिल यादव नामक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
11 जून ते 12 जून 2024 रोजीपर्यंत मो.क्र. 9691836755, 8967769643 वरून सुनील कुमार व अनिल यादव सीबीआय अधिकारी नाव सांगणार्‍या व्यक्तीने चाळीसगाव शहरातील 42 वर्षीय एका महिलेला फोनवरून धमकी की, तुम्ही एका गुन्ह्यात अडकला असून केस मिटवावी लागेल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर केस मिटवली नाही तर तुम्हाला तीन वर्षे शिक्षा होईल, अशी धमकी देत संबंधित महिलेकडून खंडणीच्या स्वरुपात वेळोवेळी ऑनलाईन आरटीजीएसद्वारे तब्बल साडेआठ लाख रुपये उकळण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तक्रार दिल्यावरून मोबाईल क्रमांक 96918367 55 आणि 8967769643 नंबर धारक सुनील कुमार व अनिल यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !