अपंग पतीचा विहिरीत ढकलून खून : धरणगाव तालुक्यातील घटना


Handicapped husband killed by pushing into a well : incident in Dharangaon taluka धरणगाव  : अपंग पती आयुष्यात काटा ठरत असल्याने पत्नीने त्यास विहिरीत ढकलून दिल्याचा संतापजनक प्रकार धरणगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या घटनेत पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश यादव सुर्यवंशी (36, भवरखेडा, ता.धरणगाव) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून संशयीत पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे खून प्रकरण
प्रकाश सूर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश सूर्यवंशी यांच्यासोबत वास्तव्याला होता. रविवार, 2 जून रोजी दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश सूर्यवंशी हिने पती प्रकाश सूर्यवंशी यास तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने नेले.

पतीच्या अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलल्याने त्याचा मृत्यू ओढवला. हा धक्कादायक प्रकार बुधवार 12 जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी ज्योती सुर्यवंशीच्या विरोधात सागर धोबी (धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !