शस्त्र दाखवून वृद्धाला लुटले : असोद्यातील घटना
An old man was robbed at gunpoint: incident in Asoda जळगाव : दुचाकीवरुन आलेल्यांनी तिघांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून असोदा ग्रामपंचायतीजवळ बसलेल्या एका वृद्धाला लुटले. वाल्मिक अंकात बिर्हाडे (72, रा.भोळेनगर, असोदा) असे वृद्धाचे नाव आहे. ही घटना 14 जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास असोदा गावात घडली. याप्रकरणी संशयित वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दीपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) या तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे लूट प्रकरण
असोदा गावात वाल्मिक बिर्हाडे हे वृद्ध वास्तव्यास आहेत. 14 जून रोजी सायंकाळी ते ग्रामपंचायतीजवळ बसलेले असतांना त्यावेळी गावातील वैभव सपकाळे हा त्यांच्याजवळ आला. त्याच्यासोबत कल्पेश इंगळे व दीपक उर्फ धनराज सपकाळे हे दोघे होते. वैभव याने वाल्मिक बिर्हाडे यांच्याकडे हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी माझ्याजवळ पैसे नाही असे सांगितले. त्यावर कल्पेश इंगळे याने त्याच्या कंबरेला खोचलेले धारदार हत्यार बाहेर काढले आणि वृद्धाच्या मानेला लावून पैसे देतो का नाही, तर तुला हत्याराने मारून टाकू अशी धमकी दिली.

जबरदस्तीने काढली रक्कम
यावेळी वैभव सपकाळे याने वृद्धाच्या खिशातून दोन हजारांची रोकड जबदरस्तीने हिसकावून घेत ते तेथून पसार झाले. हा प्रकार तेथून जाणार्या गावातील एकाने बघितला, त्यांनी त्या टवाळखोरांना याबाबत जाब विचारला. मात्र त्यांनी तू इथून चालला जा नाही तर तुलादेखील येथेच आडवा पाडू अशी धमकी दिली. याप्रकरणी बिर्हाडे यांनी लागलीच तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरु तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
