जळगावात बांधकाम व्यावसायीकाला 70 लाखांचा गंडा : दलालाला बेड्या


70 lakhs to a construction businessman in Jalgaon: shackles to a broker जळगाव : शेतजमिनीच्या व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी न दिल्याने जळगावातील बांधकाम व्यावसायीक पियुष कमलकिशोर मणियार (26, रा. गणेशवाडी) यांची 70 लाख 48 हजार रुपयांमध्ये फसणूक करण्यात आला. हा प्रकार 28 डिसेंबर 2023 ते 14 जून 2024 दरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी व दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दलाल धीरज विजय पाटील (रा.रिंगरोड) याला अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

व्यवहारापोटी 70 लाख 48 हजार रुपये दिले
जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायीक पियुष मणियार यांना शेतजमीन घ्यायची असल्याने त्यासाठी त्यांनी रियल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंगरोड, जळगाव) याने रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) या शेतकर्‍याची शिरसोली प्र.बो. येथील गट क्र. 223/3मधील शेतजमीन विक्री असल्याचे सांगितले. मणियार यांना ती शेतजमीन आवडल्यामुळे दलाल धीरज पाटील यांच्या मध्यस्तीने मणियार व शेतकरी पाटील यांच्यात सदर जमिनीचा व्यवहार 90 लाख रुपयांमध्ये ठरला. त्यानुसार मणियार यांनी आरटीजीएस व रोखीने वेळोवेळी एकूण 70 लाख 48 हजार रुपये दिले होते. यामध्ये व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी धीरज पाटील याची असताना त्याने रजिस्ट्रेशनसाठी शेतकर्‍याला आणले नाही तसेच रक्कमदेखील परत दिली नाही.

दोन दिवसांची पोलीस कोठडी !
गुन्हा दाखल होताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित धीरज विजय पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर हे करीत आहे.

जमिन नावावर करत नसल्याने गुन्हा दाखल !
व्यवहार पूर्ण होत नसल्याने मणियार यांनी शेतकरी पाटील यास बोलवले असता एजंट पाटील याने पैसे दिले नसल्याने खरेदीखत करून देता येणार नाही, असे शेतकर्‍याने सांगितले. शेतजमीन खरेदी करुन न देता व दिलेली रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणूक केली म्हणून मणियार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र शांताराम पाटील व धीरज विजय पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


कॉपी करू नका.