अमळनेर शहरातील गोदावरी नगरात धाडसी घरफोडी


अमळनेर : अमळनेर शहरातील गोदावरी नगरात तरुणाचे बंद घर फोडत चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून 65 हजारांचा ऐवज लांबवला. घरफोडीचा प्रकार रविवार, 16 जून रोजी सकाळी सहा वाजता समोर आला. याप्रकरणी दुपारी दोन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
निलेश शामराव ठाकरे (32, रा.गोदावरी नगर, अमळनेर) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवार, 15 जून रोजी सायंकाळी सात वाजता निलेश हा घर बंद करून कामावर निघून गेला. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि 15 हजार रुपयांची रोकड असा एकूण 65 हजारांचा ऐवज लांबवला. रविवार, 16 जून रोजी सकाळी सहा वाजता घरफोडी उघडकीस आली. याप्रकरणी तरुणाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विनोद सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !