पाचोरा तालुक्यात भरधाव टँकरने बालकाला चिरडले


पाचोरा : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरच्या धडकेत दुचाकीवरील 15 वर्षीय बालक चिरडून ठार झाला. हा अपघात सोमवार, 17 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला. राजवीर नरेंद्र भोसले (15, रा.आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे.

परतीच्या प्रवासात वाहनाला अपघात
मयताचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावचे रहिवासी आहेत. सोमवार, . 17 जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणार्‍या टँकर खाली येऊन चिरडून ठार झाला आहे. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला. राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !