जळगावात प्रशिक्षणार्थी विमानाला अपघात


Trainee plane accident in Jalgaon जळगाव : जळगाव विमानतळावरील ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी दुपारी दीड वाजता धावपट्टीवर उड्डाण घेत असताना घसरले मात्र या घटनेत कुणालाही ईजा झाली नसल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, विमानाचा पुढील बाजूचा लँडिंग गियर निखळल्याने विमान धावपट्टीवर घसरले.

पायलट सुखरूप
जळगाव विमानतळावर ‘न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्सिट्यूट’ प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्हीटी-एलएवाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लँडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले. वीस ते तीस फूट अंतरापर्यंत विमान धावपट्टीवर घसरत गेले. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाची एकच धावपळ उडाली. या घटनेत विमानातील प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप बचावला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !