साकेगावातील दुध विक्रेत्याचा खून : आरोपीला अखेर अटक


भुसावळ : अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून साकेगाव येथील 40 वर्षीय दुध विक्रेता नसीर बशीर पटेल (40, रा.साकेगाव, ता.भुसावळ) यांचा संशयीत आरोपी धीरज गणेश शिंदे (22, जुना सातारा, भुसावळ) याने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने मृत्यू झाला होता. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती तर खुनानंतर आरोपीने शहरातून पळ काढला होता. आरोपीच्या शोधार्थ भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिसांची पथके रवाना झाल्यानंतर मंगळवारी रात्री आरोपीला अटक करण्यात यश आले. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, सहा.फौजदार तस्लिम पठाण, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने आरोपीचया मुसक्या आवळल्या.

तिघांचे घेतले जाब-जवाब
नसीर पटेल यांच्या खुनानंतर मंगळवारी पोलिसांनी आरोपी धीरज शिंदे याच्या आई, वडीलांसह आजीचे जवाब नोंदवले मात्र त्यांनी काय जवाब नोंदवला याबाबत अधिक माहिती देण्यास सूत्रांनी असमर्थता दर्शवली. सोमवारी सायंकाळी नसीर पटेल कोळीवाड्यात आल्यानंतर डोक्यावर तीन वेळा लोखंडी रॉड मारून आरोपीने पळ काढला होता तर या घटनेत पटेल यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी दुपारी साकेगाव येथे शोकाकुल वातावरणात पटेल यांच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !