लाचखोरांची हॅट्रीक : रामानंद नगरचा हवालदार जाळ्यात


जळगाव एसीबीची जोरदार कारवाई : रामानंदचा हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात.

जळगाव : जळगावसह नंदुरबार व धुळे जिल्ह्यात लाचखोरांसाठी मंगळवार अपशकुनी ठरला. धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षकासह नंदुरबारचा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा समन्वयक लाचेच्या जाळ्यात अडकला असतानाच जळगावच्या रामानंदचा हवालदार संभाजी शामराव पाटील (जेडीसीसी बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) यास मंगळवारी रात्री दहा हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदार अडकला जाळ्यात
जळगाव तालुक्यातील तक्रारदार यांनी 307 च्या प्रकरणात दाखल केलेली तक्रार मजबूत करण्याच्या कारणासाठी 3 मार्च रोजी दहा हजारांच्या लाचेची मागणी आरोपी संभाजी पाटील यांनी केली होती. तक्रादाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर आरोपीने रामानंद नगर पोलिस ठाण्याबाहेर मंगळवारी रात्री लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी व संजोग बच्छाव तसेच सहा.पोलीस उप निरीक्षक रवींद्र माळी, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !