असोद्यातील 40 वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


जळगाव : जळगाव तालुक्यातील आसोदा गावात ईलेक्ट्रीक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 25 जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. संगीता मच्छिंद्र कुंभार (40, रा.आसोदा) असे मयताचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोटार बंद करताना बसला विजेचा धक्क
संगीता कुंभार या पती व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील आसोदा गावात वास्तव्याला होत्या. मंगळवार, 25 जून रोजी सकाळी गावात नळाला पाणी आलेले होते. त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार सुरू केल्यानंतर ते पाणी भरत होते. थोड्या वेळाने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता त्यामुळे त्यांचे पती यांनी मोटार बंद करण्याचे पत्नी संगीता यांना सांगितल असता त्या बटन बंद करण्यासाठी गेल्या असता विद्यूत पुरवठा सुरू झाला आणि त्यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर पती मश्चिद्र कुंभार यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून खाजगी वाहनातून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहन दुगड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे असोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !