दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाख लांबवले : जळगावातील घटना


Two and a half lakhs were stolen from the trunk of a two-wheeler: the incident in Jalgaon जळगाव : पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने व्यापार्‍याच्या दुचाकीतील सुमारे अडीच लाखांची रोकड अलगद लांबवली. ही घटना शहरातील इच्छादेवी चौकातील हार्डवेअर दुकानासमोर रविवार, 23 जून रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
दीपक धोंडू चिंचोरे (51 रा.म्हसावद ता. जळगाव) हे रविवार, 23 जून रोजी कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी चौकातील हार्डवेअर दुकानासमोर उभी करून लावली होती. त्यांनी कामासाठी लागणारे अडीच लाखांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली.

अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ही रोकड चोरून नेली. डिक्कीतून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मंगळवार, 25 जून रोजी रात्री 9.30 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !