गोदान एक्स्प्रेसच्या धडकेत खामगावच्या प्रवाशाचा मृत्यू


भुसावळ : रेल्वे रूळावर मोबाईलवर बोलत असतानाच भरधाव पाठीमागून आलेल्या डाऊन 11059 गोदान एक्स्प्रेसच्या धडकेने खामगावच्या 22 वर्षीय रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना 29 फेब्रुवारी रोजी रेल्वे स्टेशन दुसखेड्यानजीक खांबा किलोमीटर क्रमांक 450/322 डी, 450/31 यु.नजीक घडली. तरुण विनोद सोनी (22, किसन नगर, खामगाव) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. मृताजवळील एटीएम कार्डावरून त्याची ओळख पटली. दुसखेडा रेल्वे स्थानकावर गंगानगर-नांदेड एक्स्प्रेस उभी असताना सोनी हे रेल्वेच्या रूळावर उभे राहून बोलत असताना पाठीमागून आलेल्या डाऊन गोदान एक्स्प्रेसची त्यांना धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासी अंमलदार एएसआय बाबूलाल खरात म्हणाले. भुसावळ लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !