बोहर्डीनजीक दुचाकी अपघात : जळगावातील तरुणाचा मृत्यू
भुसावळ : भरधाव दुचाकी चालवल्याने ती स्लीप होवून झालेल्या अपघातात जळगावातील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बोहर्डी गावाच्या पुलाजवळ 25 जून रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडला. श्रावण रघुनाथ चव्हाण (29, लक्ष्मी नगर, मेहरुण, जळगाव) असे मयताचे नाव आहे.
दुचाकी घसरल्याने अपघात
विकास रघुनाथ चव्हाण (28, लक्ष्मी नगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, मयत श्रावण चव्हाण यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने बोहर्डी गावाच्या पुलावर अपघात झाला व या अपघातात श्रावण चव्हाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. स्वतःच्या मरणास व अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नावेद अली सादीक अली करीत आहेत.

