भडगाव पोलिसांकडून सव्वा लाखांचा गुटखा जप्त
भडगाव : प्रतिबंधित असलेला गटखा, पान मसाला विक्रीसाठी वाहतूक करत असताना भडगाव पोलिसांनी वडजी रोडवर कारवाई करत विमल गुटखा, विमल तबांखु तसेच दुचाकी मिळून सुमारे एक लाख 18 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवार, 23 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
विमल गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने भडगाव पोलिसांनी तपास चक्र फिरविण्याला गती दिली. वडजी गावाजवळ विना क्रमांकाची स्कुटीवरून दोन जण येत होते. पोलिसांनी ही दुचाकी थांबवून तपासणी केली असता मुद्देमाल गवसला. गुटख्याची विविध पाकीटे, सुगंधीत तंबाखुची पाकीटे तसेच दुचाकी असा एकूण एक लाख 18 हजार 796 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. याप्रकरणी अब्दुल अहमद शेख अकबर,समीर रयाज अद्दीन (दोन्ही रा.मालेगाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल संजय पाटील करीत आहेत.

