जळगावच्या तरुणाला ट्रेडिंगच्या नावाखाली तरुणाची ऑनलाईन आठ लाखांचा गंडा
जळगाव : जळगावातील 39 वर्षीय तरुणाला ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन तब्बल आठ लाख 22 हजार रुपयांची ऑनलाईन गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
मोहम्मद शोएब रफिक (39, रा.हाजी अहमद नगर, जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून तो नोकरीला आहे. 29 फेब्रुवारी 2024 ते 4 मे 2024 च्या दरम्यान त्यांना एका नंबर वरून फोन आला. रमेशचंद्र भुतडा असे नाव सांगून त्यांनी प्रोव्हेक्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची वेळोवेळी तब्बल आठ लाख 22 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहम्मद शोएब रफिक यांनी शुक्रवार, 28 जून रोजी दुपारी 12 वाजता जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात भाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहे.
