टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली जळगावच्या महिलेला पाच लाखांचा गंडा
जळगाव : टॉस्क पुर्ण करण्याच्या नावाखाली शहरातील एका महिलेची 4 लाख 89 हजार 400 रुपयांची फवणूक झाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शनिवार, 29 रोजी गुन्हा दाखल झाला.
आमिष दाखवून घातला गंडा
नम्रता चंपालालजी जैसवाल (35, रा. सिंधी कॉलनीजवळ) या महिला सेल्स गर्ल म्हणून कार्यरत आहेत. 14 एप्रिल ते 28 मे 2024 पावेतो भोईटे नगर तसेच त्यांच्या राहत्या घरी त्या असताना अज्ञात व्यक्तीने टेलीग्राम , इंटरनेटव्दारे त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला. वेगवेगळे टास्क पूर्ण करीत जास्तीचा नफा कमवा, असे अमिष दाखविले. त्यानंतर महिलेकडून वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर चार लाख 89 हजार 400 रुपपांची रोख रक्कमेची इंटरनेटव्दारे ऑनलाईन रक्कम घेतली परंतु महिलेस नफा किंवा परतावा मिळाला नाही.

संशयितांशी संपर्क साधला असता काही एक प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने महिलेने पोलिसात कैफियत मांडली. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.
