चाकूच्या धाकावर मोबाईलची चोरी : आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : चाकुचा धाक दाखवून मोबाईलची जबरी चोरी करणार्‍या संशयित आरोपीला एलसीबीच्या पथकाने सावखेडा (ता.जळगाव) येथूल ताब्यात घेत अटक केली. अनिल काशिनाथ सोनवणे (रा.हरिविठ्ठलनगर ह.मु. सावखेडा) असे संशयिताचे नाव आहे.

धरणगाव पोलिसात दाखल होता गुन्हा
धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस कॉन्सटेबल ईश्वर पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करुन संशयिताचे नाव निष्पन्न केले. तसेच तो सध्या कोठे वास्तव्यास आहे, याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी संशयिताच्या शोधार्थ सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांचे पथक नेमून रवाना केले.

सावखेडा येथून आवळल्या मुसक्या
पथकाने सावखेडा येथे तपास केला असता संशयित गावातील भिलाटी येथे राहत असल्याचे माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी जावून त्याचा शोध घेतला असता संशयित रमेश उर्फ अनिल काशीनाथ सोनवणे (35, रा.भोलेनाथ किराणा दुकानाजवळ तडवी गल्ली हरिविठ्ठल नगर, ह.मु.सावखेडा भिलवस्ती) यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !