तळेगावात 36 वर्षीय महिलेचा निर्घृृण खून
Brutal murder of 36-year-old woman in Talegaon जामनेर : जामनेर तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला. संगीता पिराजी शिंदे (36) असे खून झालेल्या महिलेचे तर आरोपी किरण कोळी (26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
वादानंतर महिलेचा खून
तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लाहण्या (26) या तरुणाने महिलेच्या घरी जात वाद घातला व रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करीत पळ काढला. ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना घटनेची माहिती दिली. पोलीस यंत्रणा दाखल झाली. पसार आरोपी याचा शोध घेत त्याला पोलिसांनी अटक केली.

