भुसावळातील दगडफेक प्रकरणी एकास अटक
भुसावळ : भुसावळातील पोलिसांवर दगडफेक केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात बाजरपेठ पोलिसांनी रीजवान खान यास बुधवारी पहाटे अटक केली. शहरातील शनी मंदीर वॉर्डातून बाजारपेठेत येत असलेल्या जमावाला पुलावरच रोखण्यात आल्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पालिस ठाण्यात 200 जणांविरूध्द गुन्हा दाखल आहे. एनआरसी व सीएएच्या या कायद्याच्या विरूध्द भारत बंदची हाक देण्यात आल्यानंतर ही घटना घडली होती. आरोपी रीजवान खान हा जाम मोहल्ला भागात आला असल्याची माहिती मिळाल्याने सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील, बंटी कापडणे यांनी बुधवारी पहाटे 3.30 वाजता त्यास अटक करण्यात आली.


