जळगावातील तीन घरफोड्यांची उकल : टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सराफा व्यापार्‍यालाही बेड्या : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


Three house burglaries solved in Jalgaon: gang crime branch in the net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने शहरात घरफोडी करणार्‍या टोळीला अटक केली आहे. टोळीने दशरथ नगर, सुदर्शन पार्क आणि चंद्रप्रभा कॉलनी अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली देत चोरीचे दागिणे सराफ बाजारात विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर सराफाला बेड्या ठोकण्यात आल्या.

तीन आरोपींना अटक
जळगाव शहरातील शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दशरथ नगर आणि सुदर्शन पार्क तसेच जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत चंद्रप्रभा कॉलनी अशा ठिकाणी घरफोडीची घटना घडली होती. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना घरफोडीचे गुन्हे थांबविण्यासाठी संशयित आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, कमलाकर बागुल, संदीप पाटील, चालक मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढली. त्यानुसार संशयीत इसम विशाल मुरलीधर दाभाडे, शुभम उर्फ मोनू प्रभाकर चव्हाण (दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) व साथीदार विशाल संतोष भोई (रा. तांबापुरा, जळगाव) यांना अटक केली.

सराफा व्यापार्‍याला अटक
तिघांनी चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने हे सराफ बाजारातील संशयित आरोपी नेताजी पंढरीनाथ जगताप यांना दिल्याचे सांगितले. त्यानुसार नेताजी जगताप यांना देखील ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !