वाघूर नदीत बुडाल्याने निंभोर्याच्या युवकाचा मृत्यू
भुसावळ : तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय युवकाचा वाघूर नदीपात्रात अंघोळीसाठी गेल्यानंतर पाय सरकल्याने नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला.राजू सुरेश पवार (20, निंभोरा) असे मयताचे नाव असून मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मृताची बहीण मंगलाबाई प्रकाश मालचे (बेलव्हाय) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


