भुसावळात जखमी मोराला जीवदान
भुसावळ : तालुक्यातीलखडका गावाकडील न्यू ईदगाह कॉलनी जवळील बागवान हॉलच्या शेजारी एका मोरामागे कुत्रे लागल्यानंतर शेख समीर शेख नवाब यांनी तातडीने मोराला वाचवून जीवदान दिले. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणून पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्याशी चर्चा करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी महिला पोलिस कर्मचारी स्वाती सोळुंखी यांनी प्रथमोपचार केले. यानंतर वनरक्षक विजय भाईदास माळी यांच्याकडे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, सुभाष साबळे, रवी तायडे, संजय भदाणे, स्वाती सोळुंखी यांच्या उपस्थितीत सोपवण्यात आले.


