जळगाव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे भामट्याने बनवले फेक प्रोफाईल


जळगाव : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने 94782560060 या मोबाईल क्रमांकारावरून व्हॉट्सअ‍ॅप द्वारे बनावट प्रोफाईल तयार करून जिल्हा परिषदेशी सबंधित अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेज केले आहेत. अशा प्रकारचे मेसेज करून कुणाचीही दिशाभूल करण्याचा प्रकार झाल्यास तत्काळ संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल करावी व अशा मेसेजची दखल घेऊ नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले आहे.

बनावट प्रोफाईलवरून मेसेज
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या नावाचा व छायाचित्राचा वापर करून अज्ञात मोबाईल क्रमांक धारकाने बनावट प्रोफाईल तयार केले आहे. 94782560060 या क्रमांकावरून जिल्हा परिषदेशी संलग्नीत काही अधिकारी व कर्मचारी याना संशयास्पद मेसेजेस प्राप्त झाले आहेत. संबंधित व्यक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित असल्याचे दाखवत आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन सबंधिताच्या कोणत्याही मेसेज ला बळी न पडता असा प्रकार निदर्शनास येताच त्या अज्ञात मोबाईल धारकास कोणताही प्रतिसाद न देता तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !