भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयात 7 रोजी राष्ट्रीय परीषद


भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात शनिवार, 7 रोजी शारीरीक शिक्षण व आरोग्याद्वारे महिलांचे सशक्तीकरण या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे फिजिकल डायरेक्टर उद्घाटन डॉ.दिनेश पाटील करतील. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या सोमय्या कॉलेज ऑफ कला, विज्ञान, वाणिज्य विद्याविहारच्या प्राचार्य डॉ.मोनाली लोंढे, औरंगाबादच्या एस.बी.ई.एस.कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन विभागाचे डॉ.डी.आर.कांबळे, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सभासद डॉ.संदीप जैन यांच्या हस्ते होणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन फिजिकल डायरेक्टर तसेच क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !