कुसूंब्यात घरफोडी : आरोपी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे झालेल्या घरफोडीची उकल करण्यात जळगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. अविनाश बन्सीलाल पाटील यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कुसूंब्यात झाली होती धाडसी घरफोडी
कुसूंबा येथील सौभाग्य चित्तरंजन सेनापती हे उज्जैन येथे परिवारासह गेल्यानंतर बंद घरफोडून चोरट्यांनी दोन लाख 34 हजार 900 रुपयांचा ऐवज लांबवला होता. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असताना संशयीत अविनाश पाटीलबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव एमआयडीसी निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगताळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार किरण पाटील, किशोर पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !