चाळीसगावात अल्पवयीन तरुणाकडून गावठी पिस्टलसह पाच जिवंत काडतूस जप्त
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान रेकॉर्डवरील अल्पवयीन संशयीताकडून गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूस जप्त केले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. चाळीसगाव शहर पोलिसात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गस्तीदरम्यान पोलिसांची कारवाई
चाळीसगाव शहर पोलीस शहरात गस्त घालत असताना बुधवारी पहाटे 1.45 वाजेच्या सुमारास संशयीत शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील पोलीस चौकीच्या बाजुला असणार्या साई पान सेंटर समोर उभा असताना पथकाने कारवाई केली. संशयीताकडून गावठी 75 हजार रुपये किंमतीचा कट्टा व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दरम्यान, अल्पवयीन संशयीताविरोधात दंगल, खून आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकातील हवालदार योगेश बेलदार, अजय पाटील, नितेश पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, सतीष पाटील आदींच्या पथकाने केली.
