फैजपूर प्रांताधिकारी देवयानी यादव यांना निरोप
फैजपूर : फैजपूर उपविभागीय प्रांताधिकारी देवयानी यादव यांचा प्रशासकीय काळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची युपीत बदली झाल्यानंतर त्यांना निरोप देण्यात आला. प्रांताधिकारी देवयानी यादव यांची उत्तर प्रदेशात 15 जुलै रोजी बदली झाली. यानिमित्त त्यांचा सहृदय सत्कार करून महसूल विभागातील अधिकारी वर्गातर्फे निरोप देण्यात आला.
आयएएस देवयानी यादव यांच्या सात महिन्यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली. कार्यालयातील कोर्ट केसेसचा 62 टक्के निकाली काढण्यात आल्या. या काळात त्यांनी नगरपालिका प्रशासक म्हणून ही कार्यभार पाहिला. याप्रसंगी फैजपूर मंडळाधिकारी हबीब तडवी, दीपक गवई आदी मंडळी उपस्थित होती.

