वड्री धरणाच्या सांडव्यातून पाणी ओसंडले
यावल : यंदा जुलै महिन्यातचं दमदार पावसामुळे तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री गावाजवळील वड्री धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता 6.12 दलघमी आहे. या धरणाचा सांडवा सुंदर पायर्यांच्या स्वरूपात मोठी रुंदी असलेला आहे व या सांडव्यातून आता पाणी ओसंडायला सुरूवात झाली आहे.
पर्यटकांना खुणावतेय धरण
यावल तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री गावाजवळ 6.12 दलघमी क्षमता असलेले वड्री धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाला आकर्षक व मोठी रुंदी असलेला पायर्याचा सांडवा बांधण्यात आला आहे. या सांडव्यातून सध्या पाणी वाहत आहे. हे धरण खडकाई नदीवर उभारण्यात आले आहे.दरवर्षी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होतो व दरवर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरते. या धरणातील सांडव्यातून वाहणारे पाणी सातपुड्याच्या र्सांदर्यात भर टाकत असून ते पर्यटकांना खुणवत आहे.

