भादलीजवळ लेव्हल क्रॉसिंग गेट 150 देखभालीसाठी महिनाभर बंद


भुसावळ : भुसावळ विभागातील भादली-जळगाव दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्र.150 चे आवश्यक कार्यासाठी मन्यारखेडा कडे रस्ता आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी 23 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान 31 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांसह वाहनधारकांची गैरसोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 150 किमी 424/21-23 हे 23 जुलै सकाळी सहा ते 22 ऑगस्ट दरम्यान 31 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिक व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !