रेल्वेतर्फे दानापूर, समस्तीपूरसाठी विशेष गाड्या धावणार


भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते दानापूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते समस्तीपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा लाभ मिळणार आहे. रेल्वेतर्फे चालविण्यात येणार्‍या गाड्यांमध्ये पुणे ते दानापूर विशेष गाडी चालविली जाणार आहे, या गाडीच्या चार फेर्‍या होतील. विशेष गाडी पुण्याहून 21 व 25 जुलैला रात्री 7.55 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी पहाटे 4.30 वाजता दानापूरला पोहोचणार आहे. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. 01422 विशेष गाडी दानापूरहून 23 व 27 जुलैला सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी 5.35 वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. ही गाडी दौंड कॉर्डलाईन, नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, बक्सर आणि आरा येथे थांबेल.

एलटीटी-समस्तीपूर विशेष गाडी
लोकमान्य तिलक टर्मिनस (मुंबई) ते समस्तीपूर या गाडीच्या चार फेर्‍या होतील. 01043 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून 20 व 24 जुलैला दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री 9.15 वाजता समस्तीपूरला पोहोचणार आहे. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. विशेष गाडी समस्तीपूरहून 25 जुलैला रात्री 11.20 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 7.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोचेल. या गाडीच्या दोन फेर्‍या होतील. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरीया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिनदयाळ उपाध्याय, बक्सर,आरा,दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुजफ्फरपूर येथे थांबणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !