जळगावात तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी रॉड


जळगाव : काही एक कारण नसताना खिशातील लोखंडी रॉड डोक्यात टाकल्याने तरुण जखमी झाला. गुरुवार, 18 रोजी सकाळी 10.15 वाजता धान्य मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडली.

राजु रामदेव प्रजापत ( वय 38 रा. अरिहंत कॉलनी) हे बारदान व्यावसायिक असून त्यांचे दुकान आहे. या दुकानावर राजु प्रजापत दुकानावर आले होते. दीपक प्रजापत हेही दुकानावर आले. व त्यांनी राजु यांना शिवीगाळ केली. संशयिताने खिशातील रॉड राजु प्रजापत यांच्या डोक्यात टाकुन दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा शुक्रवार, 19 रोजी दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !