वाळू माफियांची मुजोरी कायम : भुसावळ तहसीलमधून भर दिवसा रेतीचा डंपर पळवला

साकेगावच्या चालकाला अटक : मालकासह डंपरचा कसून शोध


भुसावळ : अवैधरित्या वाळू वाहतूक करताना महसूल प्रशासनाने जप्त केलेला डंपर वाळू माफियांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून लांबवल्याची घटना 19 रोजी सायंकाळी सात ते 20 जुलै रोजी सकाळी 9.30 दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर वाळू माफियांची मुजोरी पुन्हा समोर आली आहे.

डंपर चालकाला अटक
वरणगाव मंडळाधिकारी रजनी शंकर तायडे (भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, तहसील कार्यालयाच्या आवारात डंपर (एम.एच.19 झेड.5301) हा अवैधरीत्या रेतीची वाहतूक केल्यामुळे जप्त करण्यात आला होता मात्र 19 रोजी सायंकाळी सात ते 20 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजेदरम्यान संशयीत अंबू मिर्झा (मेहरुण, जळगाव) व समाधान पाथरवट (साकेगाव, ता.भुसावळ) यांनी अडीच ब्रास रेतीसह सहा लाख रुपये किंमतीचे डंपर लांबवले. या प्रकारानंतर शहर पोलिसांनी समाधान पाथरवट यास अटक केली आहे.

वाळू माफियांची मुजोरी वाढली
दरम्यान, भरदिवसा तहसीलमधून डंपर लांबवण्यात आल्याने वाळू माफियांची दादागिरी पुन्हा समोर आली असून डंपरसह आरोपी मालकाला शोधण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ईकबाल सैय्यद करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !