फैजपूर शहरातील मोबाईल नेटवर्क टॉवरांना कर वसुलीची नोटीस
फैजपूर : फैजपूर शहरात मोबाईल नेटवर्कच्या चार कंपन्यांनी महसूल रक्कम थकली असल्याने यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या आदेशाने चार मोबाईल नेटवर्क कंपनी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. फैजपूर शहरातील चार मोबाईल कंपन्यांकडून दोन लाख 32 हजार 80 रुपयांची रक्कम महसूल विभागाची थकली आहे. यात व्होडाफोन 48 हजार 800, रीलायन्स 60 हजार 480, एअरटेल 74 हजार व ईण्डस 48 हजार 800 रु असे एकूण दोन लाख 32 हजार 80 रुपये अनधिकृत बिनशेती दंड चारही मोबाईल नेटवर्क कंपन्याकडून येणे बाकी असल्याने या कंपन्यांना नोंदीस बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांची मुदत देण्यात आली बसून अन्यथा नेटवर्क टॉवर सील करण्यात येतील, असा इशारा नोटीसीतून देण्यात आला आहे. यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्कल जी.डी.बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, कोतवाल तुषार जाधव यांनी नोटीस चिपकवली आहे.


