मुंबई मार्गावर होळीसाठी विशेष रेल्वेगाडी धावणार
भुसावळ : होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने गोरखपूर-मुंबई या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन फेर्या होणार आहेत. डाऊन 02598 मुंबई-गोरखपूर विशेष गाडी शनिवारी 7 व 14 फेब्रुवारी या दिवशी मुंबई येथून दुपारी 2.10 वाजता सुटणार आहे. दुसर्या दिवशी ही गाडी रात्री आठ वाजता गोरखपूूरला पोहोचेल. अप 02597 गोरखपूर-मुंबई विशेष गाडी शुक्रवारी 6 व 13 मार्चला गोरखपूर येथून सकाळी आठ वाजता सुटणार आहे. दुसर्या दिवशी ही गाडी दुपारी 12.20 वाजता मुंबईत पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, ईगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, होशंगाबाद, भोपाळ, विदीशा या स्थानकांवर थांबणार आहे.


