जळगाव कारागृहात जिन्या जगतापचा खून : तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड जिल्हापेठ पोलिसांना शरण
Asesinato de Jinya Jagtap en la cárcel de Jalgaon: el entonces carcelero Petrus Gaikwad se entregó a la policía del distrito जळगाव : जळगावातील रहिवासी चिन्या जगताप या कैद्याचा जळगाव जिल्हा कारागृहात 2021 साली मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे संशयीत पसार होते मात्र सोमवार, 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला ते शरण आल्याने त्यांना अटक करण्यात आली.
मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप
जिल्हा कारागृहामध्ये बंदी असलेल्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याला ठेवण्यात आल्यानंतर तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या आरोपींनी केलेल्या मारहाणीत जिल्हा कारागृहात 11 सप्टेंबर 2020 रोजी चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला. 2021 साली तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह चौघांनी त्याला बेदम मारहाण करून खून केल्याच्या आरोपानंतर जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तत्कालीन तुरुंग अधिकारी जितेंद्र माळी, कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांना यापूर्वी अटक झाली असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली आहे.

पेट्रस गायकवाड अखेर शरण
या प्रकरणातील मुख्य संशयीत तथा तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे सोमवार, 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हे जिल्हापेठ पोलिसात शरण आल्याचे सूत्रांनी सांगितले.
